Page Nav

HIDE

Breaking News:

latest

देशभरात उद्या तीन तास केबल सेवा बंद

देशभरातील केबल व्यावसायिकांनी उद्या तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रायच्या नव्या नियमांचा निषेध नोंदवण्यासाठी केबल व्या...

देशभरातील केबल व्यावसायिकांनी उद्या तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रायच्या नव्या नियमांचा निषेध नोंदवण्यासाठी केबल व्यावसायिक उद्या (27 डिसेंबर) लाक्षणिक आंदोलन करणार आहेत. केबल व्यावसायिक उद्या संध्याकाळी सात ते रात्री 10 या वेळेत केबल सेवा बंद ठेवणार असल्यामुळे प्रेक्षक प्राइम टाइम मधील अनेक मालिकांना मुकणार आहेत.

टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) देशभरातील केबल टीव्हीडीटीएच ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचबरोबर केबल टीव्ही व्यावसायिकांवर जाचक अटी घातल्या असल्याचा आरोप करत देशभरातील केबल व्यावसायिकांनी गुरुवारी 27 डिसेंबर रोजी तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

तसेच यासंदर्भात चर्चा करण्य़ासाठी केबल व्यावसायिकांचीआज मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत ट्राय व उपग्रह वाहिन्यांच्या विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात येईल.

No comments