Page Nav

HIDE

Breaking News:

latest

केस वाढविण्यासाठी 'हे' उपाय ठरतील फायदेशीर | अशी घ्या केसांची काळजी!

केसांचं सौंदर्य  राखण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. अशातच आपलेही सुंदर ,  दाट आणि लांब केस असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. त्यास...

केसांचं सौंदर्य राखण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. अशातच आपलेही सुंदरदाट आणि लांब केस असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. त्यासाठी बऱ्याचदा बाजारांमध्ये मिळणाऱ्या ब्युटीप्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. परंतु अनेकदा हे सर्व उपाय निष्फळ ठरतात. अनेकदा तर केसांची नीट निगा न राखल्यामुळे केसांच्या अनेक समस्या उद्भवतात.

केसांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आणि केस डॅमेज झाल्यामुळे केसांची वाढ खुंटते. परंतु काही सोप्या आणि घरगुती उपायांनी केस मजबूत आणि लांब करू शकता. जाणून घेऊयात काही टिप्स ज्यांचा वापर करून तुम्ही केसांचं सौंदर्य वाढवू शकता.

1. वेळोवेळी केस ट्रिम करा
केसांना साधारणतः आठ आठवड्यांनंतर ट्रिम करणं गरजेचं असतं. यामुळे डॅमेज केसांपासून सुटका करून घेणं शक्य होतं आणि केसांची वाढ होते.

2. केसांना कंडिशनर लावा
कंडिशनर केसांना चमकदार करण्यासाठीच नाही तर केस वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरतो. केस शॅम्पूने धुतल्यानंतर शुष्क होतात. ज्यामुळे त्यांची ग्रोथ खुंटते. अशातच कंडिशनरमुळे स्काल्पचा शुष्कपणा दूर होतो.

3. हॉट ऑइलने मसाज
केसांना मसाज करणं आवश्यक असतं. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं. तसेच यामुळे केस मजबुत होण्यासही मदत होते. शक्य असल्यास तुम्ही हॉट ऑइल समाज करण्यासाठी खोबऱ्याचं तेलऑलिव्ह ऑइल आणि लेव्हेंडर ऑइलचाही वापर करू शकता.

4. झोपण्यापूर्वी केस व्यवस्थित विंचरा
तुम्ही ऐकलं असेल केस सतत विंचरल्यामुळेही गळतात. परंतु हे विधान अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित केस विंचरत नसाल तर त्यामुळे केस गळतात किंवा तुटतात. सिंथेटिक ब्रिस्टल असलेला कंगव्याचा वापर केल्याने केस डॅमेज होतात. केसांचे आरोग्य राखण्यासाठी बोअर ब्रिस्टल ब्रश वापरणं फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरल्यामुळे आणखी वाढतात.

5. केस वरच्या आणि खालच्या दिशेने फ्लिप करा
केस वरच्या आणि खालच्या दिशेने फ्लिप केल्यामुळे त्यांची वाढ लवकर होते. त्यामागील कारण असं सांगण्यात येतं कीकेस काही मिनिटांसाठी फ्लिप केल्यामुळे डोक्यामध्ये रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि त्यामुळे केस वाढतात.

No comments