Page Nav

HIDE

Breaking News:

latest

येत्या २५ जानेवारीला 'ठाकरे' शिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही- बाळा लोकरे

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित  ' ठाकरे '   हा चित्रपट येणार असून कालच या चित्रपटा...

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येणार असून कालच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डाने यातील काही प्रसंग आणि संवांदांवर आक्षेपदेखील घेतला होता. दरम्यान शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी आता येत्या २५ जानेवारीला 'ठाकरेशिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असे म्हटले आहे.

हा इशारा बाळा लोकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिला आहे. तर लोकरे एका माध्यामाशी बोलताना म्हणाले कीठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्यामुळेइतर कोणताही चित्रपट यादिवशी आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. जर कोणी चित्रपट प्रदर्शित केलाच तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ.

आता 'मणिकर्णिका' च्या अडचणीत लोकरे यांच्या या इशाऱ्यानंतर आणखी एक वाढ झाली आहे. २५ जानेवारीला कंगनाची मुख्य भूमिका असलेला 'मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. आता शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेत काही बदल होतात काहे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


©Copyright MarathiBoi Media Network

No comments