Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'ठाकरे'चा ट्रेलर आज प्रदर्शित होणार, तत्पूर्वीच हा सिनेमा वादात

शिवसेनाप्रमुख   बाळासाहेब ठाकरे  यांच्या जीवनावर आधारित  ' ठाकरे '  सिनेमा वादाच्या कचाट्यात अडकला आहे. या सिनेमाची रसिकांमध्ये उत्स...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरेसिनेमा वादाच्या कचाट्यात अडकला आहे. या सिनेमाची रसिकांमध्ये उत्सुकता आहे. सिनेमाचा पहिला टीझर लॉन्च झाल्यापासूनच ठाकरे सिनेमाची रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. आज दुपारी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहेपण या चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे.

अभिजीत पानसरे दिग्दर्शित आणि खासदार संजय राऊत निर्मित बहुचर्चित 'ठाकरेसिनेमाचा ट्रेलर आज दुपारी 1.30 वाजता लाँच करण्यात येणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेला 'ठाकरेसिनेेमाचा टीझर पाहून रसिकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. मात्रतत्पूर्वीच हा सिनेमा वादात अडकला आहे. सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार की नाहीयाबाबत निश्चित सांगता येत नाही. पणशिवसेना खासदार आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी ट्रेलर नियोजित वेळेनुसारच लाँच होईलअसे स्पष्ट केलं आहे. त्यासाठीशिवसेना नेते सेन्सॉर बोर्डाची प्रक्रिया आणि संबंधित बाबींची पूर्तता करत असल्याचेही समजते.

ठाकरे सिनेमा म्हटलं की बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याची रसिकांना आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला प्रतीक्षा होती. मात्रसिनेमाच्या टीझरमधूनच बाळासाहेबांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार असल्याचे स्पष्ट झाले. हुबेहूब बाळासाहेबांची शैली साकारत नवाजुद्दीनने साऱ्यांची मनं जिंकली आहेत. बाळासाहेबांसोबतच उद्धवराजमीनाताई ठाकरेमनोहर जोशीशरद पवार यांच्या भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी रसिक आतुर आहेत. मात्रयातील काही बाबी आजच्या ट्रेलरमधून स्पष्ट होतीलअसा अंदाज आहे.

No comments