Page Nav

HIDE

Breaking News:

latest

गौतम बुद्धांच्या या गोष्टी लक्षात ठेवा आणि नेहमी आनंदी रहा !!

बौद्ध धर्माचे  संस्थापक गौतम बुद्ध यांनी आपल्या प्रवचनांमध्ये आयुष्य सुखी आणि यशस्वी बनवण्याचे विविध सूत्र सांगितले आहेत. या सूत्रांचा जीवना...

बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांनी आपल्या प्रवचनांमध्ये आयुष्य सुखी आणि यशस्वी बनवण्याचे विविध सूत्र सांगितले आहेत. या सूत्रांचा जीवनात अवलंब केल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. जाणून घ्याबुद्धांचे हे अनमोल विचार...

1) संशयी स्वभाव अत्यंत घातक राहतो. हा स्वभाव दोन चांगले मित्रप्रेमी आणि कोणत्याही चांगल्या नात्याला नष्ट करतो. यापासून दूर राहावे.

2) अज्ञानी व्यक्ती एखाद्या बैलाप्रमाणे असतो. तो ज्ञानाने नाही तर आकाराने वाढतो.

3) क्रोध पाळणे हे गरम कोळसा इतरांच्या अंगावर फेकण्यासाठी हातात धरल्याप्रमाणे आहेयामुळे आपला हातही भाजतो.

4) या संसारात आनंद आणि दुःख स्थायी असू शकत नाही. तुम्ही अंधारात असाल तर तुम्हाला प्रकाशाचा शोध घेणे आवश्यक आहे.

5) निघून गेलेल्या काळात ध्यान केंद्रित करू नये. भविष्यासाठी स्वप्न पाहू नयेत तर बुद्धीचा वापर वर्तमानात केंद्रित करावा.

6) तुम्ही तुमच्या क्रोधासाठी दंडित होत नाहीत तर तुम्ही तुमच्या क्रोधामुळेच दंडित होता.

7) प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्य आणि आजाराचा लेखक आहे. यामुळे आहार आणि दिनचर्या याकडे विशेष लक्ष द्यावे.

8) ज्याप्रकारे मोठे वादळाही मजबूत दगडाला हलवू शकत नाहीत्याचप्रकारे संत स्वतःच्या कौतुक आणि आलोचनेने प्रभावित होत नाही.

9) मनच सर्वकाही आहेतुमची जसा विचार करता तसेच बनता.

No comments