Page Nav

HIDE

Breaking News:

latest

जाणून घ्या साराच्या ‘केदारनाथ’ ची दोन आठवड्याची कमाई

सारा अली खान  आणि  सुशांत सिंग  राजपूत यांची प्रमुख भूमिका असलेला  ‘ केदारनाथ ’  दोन आठवड्यापूर्वी प्रदर्शित झाला. रजनीकांतच्या  2.0  चं मोठ...

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत यांची प्रमुख भूमिका असलेला केदारनाथ’ दोन आठवड्यापूर्वी प्रदर्शित झाला. रजनीकांतच्या 2.0 चं मोठं आव्हान समोर असताना या चित्रपटानं चांगली कमाई केली. विशेष म्हणजे साराच्या भूमिकेचं या चित्रपटात खूपच कौतुक करण्यात आलं. साराचा हा पहिलाच चित्रपट असल्याकारणानं साऱ्यांचं लक्ष तिच्याकडे होतं. आपल्या अभिनयानं सर्वांचं मन जिंकून घेण्यात ती यशस्वीही झाली.

या चित्रपटानं आतापर्यंत 57 कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 42.45 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आठड्यात 11 कोटींहून अधिकचा गल्ला जमवण्यात केदारनाथ यशस्वी झाला.

मात्र तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तग धरतो का हे पाहण्यासारखं ठरेल. कारण शाहरूखच्या झिरो चं आव्हान या चित्रपटसमोर असणार आहे.  अभिषेक कपूर दिग्दर्शित केदारनाथमध्ये मुस्लिम पिठ्ठू आणि ब्राह्मण मुलगी यांच्या प्रेमाची कथा दाखवण्यात आली आहे.

No comments