Page Nav

HIDE

Breaking News:

latest

मी पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं!! सोनू निगम

संगीत क्षेत्रातील आघाडीचे नाव म्हणून गायक  सोनू निगमची  ओळख आहे. आजवर त्यानेअनेक सुपर-डुपर हिट गाणी गायली आहेत. चाहत्यांमध्ये त्याच्या आवाजा...

संगीत क्षेत्रातील आघाडीचे नाव म्हणून गायक सोनू निगमची ओळख आहे. आजवर त्यानेअनेक सुपर-डुपर हिट गाणी गायली आहेत. चाहत्यांमध्ये त्याच्या आवाजाची क्रेझही पाहायला मिळते. मात्रसोनू निगमने संगीत क्षेत्रात भारतीय गायकांसोबत केला जाणाऱ्या दुजाभावाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी गायकांच्या तुलनेत भारतीय गायकांना मिळणारी प्रसिद्धी आणि वागणुकीबाबत गायक सोनू निगमनं खंत आणि तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मी जर पाकिस्तानी गायक असतो तर कदाचित जास्त ऑफर मिळाल्या असत्या असं कधी-कधी वाटायला लागतंअसं तो म्हणाला. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यानं हे मत व्यक्त केलं.

आजच्या काळात गायकांना गाण्यासाठी म्यूझिक कंपनीला पैसे द्यावे लागतात. शोसाठी म्यूझिक कंपनी भारतीय गायकांकडून पैसे मागतात. पैसे दिले की तुम्हाला प्रसिद्धी देतात. मात्र पैसे देण्याचं नाकारलं की मात्र तुम्हाला ते गाऊ देत नाही ना काम देत. आताच्या घडीला भारतीय गायकांची ही परिस्थीती आहे. पण आपल्या देशात पाकिस्तानी गायकांना मात्र चांगली वागणूक दिली जातेशोसाठी त्यांच्याकडून कंपनी पैसे घेत नाही. त्यांना इथे कामही मिळतं. मग हा दुजाभाव केवळ भारतीय कलाकारांसोबत कात्यापेक्षा पाकिस्तानी गायक असलेलं काय वाईट आहे?’ असं म्हणत सोनूनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

No comments