Page Nav

HIDE

Breaking News:

latest

स्मार्टफोन न वापरल्यास 'ही' कंपनी देणार ७१ लाख | जाणून घ्या काय आहे ऑफर ?

जर तुम्हाला कोणी म्हणाले की स्मार्टफोनचा वापर बंद करा. तर तुम्ही त्याला काय म्हणाल. कदाचित तुमचे उत्तर असेल  ' मुळीच नाही '.  मात्र ...

जर तुम्हाला कोणी म्हणाले की स्मार्टफोनचा वापर बंद करा. तर तुम्ही त्याला काय म्हणाल. कदाचित तुमचे उत्तर असेल 'मुळीच नाही'. मात्र जर तुम्हाला कोणी असे म्हटले की स्मार्टफोनचा वापर बंद केल्यास तुला 71 लाख रुपये मिळतील तेव्हा मात्र तुम्ही झटकन हो म्हणाल. एक कंपनी स्मार्टफोनचा वापर न केल्यावर 71 लाख रुपये देत आहे. होहे अगदी खरं आहे.

जाणून घ्या काय आहे ऑफर ?
ही ऑफर देणाऱ्या कंपनीचे नाव आहे विटामिनवॉटर (Vitaminwater). या कंपनीच्या ऑफरनुसार जर तुम्ही एक वर्षासाठी स्मार्टफोनचा वापर केला नाही तर तुम्हाला १ लाख डॉलर म्हणजे जवळपास 71 लाख रुपये मिळतील. विटामिनवॉटर ही कंपनी कोका-कोलाच्या मालकीची आहे.

कंपनीने मॉर्केटिंग कॅम्पेनसाठी स्मार्टफोन युझर्सला ही ऑफर दिली आहे. कंपनीने यावर बोलताना स्पष्ट केले आहेकी आमचा कोणत्याही विशिष्ट मोबाईल निर्मिती करणाऱ्या कंपनीला टार्गेट करण्याचा उद्देश्य नाही. कंपनी हे कॅम्पेन चालवून हे निश्चित करू इच्छितेकी आजच्या काळातही कोणी विना स्मार्टफोन राहू शकतो का आणि जर राहू शकतो तर किती दिवसांसाठी?

कंपनीने या गोष्टीची खात्री करण्यासाठी 'लाय डिटेक्टर टेस्ट'चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे त्यांना खात्री पटेलकी तुम्ही स्मार्टफोनचा वापर केलेला आहे किंवा नाही. जर लाय डिटेक्टर टेस्टमध्ये नापास झालात तर स्पर्धेतून तुम्ही बाद व्हाल.

स्पर्धेत कसा घ्याचा सहभाग?
जर तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला आपल्या ट्विटर किंवा इन्स्टाग्रामवर 8 जानेवारी 2019 पर्यंत #nophoneforayear आणि #contest या हॅशटॅगसह पोस्ट शेअर करावी लागेल.

पोस्टमध्ये काय लिहायचे?
ट्विटर किंवा इन्स्टाग्रामवर तुम्हाला तुमचा फोटो किंवा या ऑफरच्या फोटोसोबत #nophoneforayear आणि #contest  हॅशटॅगचा वापर करत ट्विट करायचे आहे. ट्विटमध्ये तुम्हाला सांगायचे आहेकी तुम्ही स्मार्टफोनचा वापर का बंद करत आहात आणि स्मार्टफोनचा वापर बंद केल्यानंतर मिळालेल्या फावल्या वेळात तुम्ही कोणत्या कामांवर लक्ष केंद्रीत करणार आहात.


No comments