Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'मुळशी पॅटर्न'च्या रिमेकमध्ये दिसणार आयुष शर्मा | सलमान काढणार ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक

लव्हयात्री   चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता आयुष शर्मा मराठी चित्रपट  ' मुळशी पॅटर्न '  च्या रिमेकमध्ये झळकणार आहे....

लव्हयात्री चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता आयुष शर्मा मराठी चित्रपट 'मुळशी पॅटर्नच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. हा हिंदी रिमेक असून आयुषची यात मुख्य भूमिका असणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसारआयुषने यावर्षी रिलीज झालेल्या मुळशी पॅटर्नच्या रिमेक चित्रपट साईनही केला आहे. तसेच सलमान खानने या चित्रपटाचे अधिकार खरेदी केले असून याचा हिंदी रिमेक बनविण्याची परवानगी घेतली आहे.

हा चित्रपट मुळशी तालुक्यातील गुन्हेगारी जगतावर भाष्य करणाऱ्या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत होता आणि बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. अभिजित भोसले आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन प्रस्तुत 'मुळशी पॅटर्न' चित्रपट २३ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

विकास आणि पैश्याच्या लोभापायी गावकऱ्यांनी आपल्या जमीनी विकल्या. सुखसोयी उपभोगल्या. जमिनी विकून पेटीभर पैसे घेऊन सधन शेतकरी म्हणून मिरवलेले लोक २००८ नंतर पैसे संपल्यावर आपल्याच जागांवर उभ्या राहिलेल्या आयटीपार्क आणि इतर उद्योगांमध्ये सुरक्षारक्षक किंवा चपराशी म्हणून काम करून लागले. पुढची पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळली . गुन्हेगारीकडे वळलेल्या या सगळ्या मुलांचा शेवट अखेर रक्ताच्या थारोळ्यात झाला अशी कथा या चित्रपटाची आहे.

No comments