Page Nav

HIDE

Breaking News:

latest

‘कॉमेडीचा बादशहा’ कपिल शर्मा अडकला विवाहबंधनात | पाहा, लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ !!

कॉमेडीचा बाहशहा  कपिल शर्मा- देखील विवाहबंधनात अडकला. कपिलनं आपली प्रेयसी गिन्नी छत्रत हिच्याची विवाहगाठ बांधली. कुटुंबीय आणि मोजक्याच मित्र...

कॉमेडीचा बाहशहा कपिल शर्मा-देखील विवाहबंधनात अडकला. कपिलनं आपली प्रेयसी गिन्नी छत्रत हिच्याची विवाहगाठ बांधली. कुटुंबीय आणि मोजक्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत जालंधरमध्ये कपिल आणि गिन्नीचा विवाहसोहळा पार पडला.

कपिलनं ट्विटरवर विवाहसोहळ्यातला फोटो शेअर केला. सुनील ग्रोव्हरसह अनेक सेलिब्रिटींनी कपिलवर शुभेच्छांचा वर्षाव केला. गेल्या काही वर्षांपासून कपिल गिन्नीला डेट करत होता. या विवाहसोहळ्यासाठी कृष्णा अभिषेकसिमोना चक्रवर्तीभारती सिंग असे काही मोजके सेलिब्रिटी उपस्थित होते. कपिल या सहकलाकारांसोबत मिळून लवकरच द कपिल शर्मा शो घेऊन छोट्या पडद्यावर परतत आहे. सलमान खान स्वत: या शोचा निर्माता असणार आहे.

या आठवड्याच्या सुरूवातीला अमृतसरमध्ये मेहंगीसंगीतजागरण असे लग्नविधी आणि विवध कार्यक्रम पार पडले. त्यानंतर १२ डिसेंबरला कपिल प्रेयसी गिन्नीसोबत विवाहबंधनात अडकला. १४ तारेखला कपिलनं त्यांच्या कुटुंबीयांसाठी अमृतसरमध्ये रिसेप्शनचं आयोजन केलं आहे त्यानंतर बॉलिवूडसाठी मुंबईतदेखील तो रिसेप्शनचं आयोजन करणार आहे.


गतवर्षी मार्चमध्ये मिट माय वाईफ’ अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जगजाहिर केले होते. यानंतर कपिल व सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणाचा एक अंग गाजला होता. याचदरम्यान मध्यंतरी कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पण कालांतराने ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. कॉलेजमध्ये असताना गिन्नीच्या नाटकांच्या प्रयोगांमध्येही तो तिची खूप मदत करायचा.  गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशनव्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला आहे. लवकरच कपिल छोट्या पडद्यावर परतणार आहे. 


No comments