Page Nav

HIDE

Breaking News:

latest

व्यायाम केल्यानंतर मोसंबीचे ज्यूस पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहे का?

आपले शरीर तंदुरुस्त  ठेवण्यासाठी काहीजण घरीच व्यायाम करतात. तर ,  काही जिमला जातात. जिमवरुन आल्यानंतर काहीजण प्रोटीन शेक घेत असतात. तुम्हाला...

आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी काहीजण घरीच व्यायाम करतात. तरकाही जिमला जातात. जिमवरुन आल्यानंतर काहीजण प्रोटीन शेक घेत असतात. तुम्हाला जास्तीत-जास्त प्रोटीन मिळवायचे असतील तर जीमवरुन आल्यावर मोसंबीचे ज्यूस पिणे फायदेशीर ठरते. मोसंबीच्या ज्यूसमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. चला तर मग जाणून घेऊयात मोसंबीचे ज्यूस पिण्याचे वेगवेगळे फायदे...

मोसंबी ज्यूस पिण्याचे फायदे:
1. पचनक्रिया राहते सुरळीत
जिमवरुन आल्यावर मोसंबीचे ज्यूस पिल्याणे आपल्या शरीरातील पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. मोसंबीच्या रसामुळे पोटदुखीच्या समस्यांपासुन सुटका होते.

2. कफ कमी होण्यास मदत
तुम्हाला कफचा त्रास होत असेल तर मोसंबीचे ज्यूस सेवन करा. याचे सेवन केल्यास पोटातील वायूदेखील कमी होण्यास मदत होते. 

3. शरीराला ऊर्जेचा पुरवठा
मोसंबीच्या रसामध्ये व्हिटॅमीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि शरीर नेहमी उत्साही राहण्यास मदत होते. 

4. डोळ्याच्या आरोग्यासाठी गुणकारी  
डोळ्याच्या आरोग्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत फायदेशीर असतो. स्वच्छ पाण्यामध्ये मोसंबीच्या रसाचे थेंब टाकावे. या पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांना होणारा संसर्ग टाळता येतो. 

5. वाढलेले वजन कमी करण्यास मदत
मोसंबीच्या रसामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. मोसंबीच्या रसामध्ये मध टाकून पिल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

6. रक्त स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर
मोसंबीचे ज्यूस पिल्याने रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच त्वचेचे तेज नितळण्यास मदत होते.

No comments