Page Nav

HIDE

Breaking News:

latest

रेयान..वय वर्ष 7..कमाई 155 कोटी रुपये | सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 युट्यूब चॅनल्स

तुमच्यापैकी कदाचित कोणीही असा नसेल जो  युट्यूबवरील  व्हिडीओ पाहत नसावा. पण तुम्हाला युट्यूबवर सर्वाधिक कमावणारा कोण आहे हे माहितीये का? तुम्...

तुमच्यापैकी कदाचित कोणीही असा नसेल जो युट्यूबवरील व्हिडीओ पाहत नसावा. पण तुम्हाला युट्यूबवर सर्वाधिक कमावणारा कोण आहे हे माहितीये का? तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की युट्यूबवर सर्वाधिक कमाई करणारा एक अवघ्या सात वर्षाचा लहानगा मुलगा आहे.

फोर्ब्स मासिकाने नुकतीच जून 2017 ते जून 2018 दरम्यान युट्यूबद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्यांची एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमेरिकेतील रेयान हा अवघ्या सात वर्षांचा मुलगा अव्वल स्थानावर आहे. या कालावधीतील त्याची कमाई तब्बल 22 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 155 कोटी रुपये आहे. युट्यूबवर RyanToysReview या नावाने त्याचं स्वतःचं एक चॅनल आहे. या चॅनलवर केवळ विविध प्रकारच्या खेळण्यांचे रिव्ह्यू तो देत असतो. रेयानच्या युट्यूब चॅनलला सध्या 1.73 कोटींहून जास्त जणांनी (17,314,022 युजर्स) सबस्क्राइब केलंय.

सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 युट्यूब चॅनल्स –
– रेयान टॉयज रिव्ह्यू (Ryan Toys Review) 22 दशलक्ष डॉलर (154.84 कोटी रुपये)
– जॅक पॉल (Jake Paul) 21.5 दशलक्ष डॉलर (151.32 कोटी रुपये)
– ड्यूड परफेक्ट (Dude Perfect) 20 दशलक्ष डॉलर (140.74 कोटी रुपये)
– डेन टीडीएम (DanTDM) 18.5 दशलक्ष डॉलर (130.21 कोटी रुपये)
– जेफ्री स्टार (Jeffree Star) 18 दशलक्ष डॉलर (126.67 कोटी रुपये)
– मार्किप्लायर (Markiplier) 17.5 दशलक्ष डॉलर (123.15 कोटी रुपये)
– व्हेनस गेमिंग (Vanoss Gaming) 17 दशलक्ष डॉलर (119.63 कोटी रुपये)
– जॅकसेप्टिस आय (Jacksepticeye) 16 दशलक्ष डॉलर (112.61 कोटी रुपये)
– प्यूडायपाय (PewDiePie) 15.5 दशलक्ष डॉलर (109 कोटी रुपये)
– लोगन पॉल (Logan Paul) 14.5 दशलक्ष डॉलर (102 कोटी रुपये)


No comments