Page Nav

HIDE

Breaking News:

latest

या व्यक्तींनी 350 रुपयांमध्ये पोकर खेळून जिंकले तब्बल 7 करोड रुपये

आपल्याला कधी अपेक्षाही केले नसेल असे काही सरप्राईज अचानक मिळाले तर आपला आनंद गगनात मावेनासा होतो. असेच काहीसे  ख्रिसमसच्या  दिवशी घडले आहे. ...

आपल्याला कधी अपेक्षाही केले नसेल असे काही सरप्राईज अचानक मिळाले तर आपला आनंद गगनात मावेनासा होतो. असेच काहीसे ख्रिसमसच्या दिवशी घडले आहे. अनपेक्षितपणे एका व्यक्तीला करोडो रुपयांची लॉटरीच जणू लागली आहे.

ख्रिसमसच्या दिवशी अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहणारे हेरॉल्ड एम यांना अनोखे गिफ्ट मिळाले आहे. ख्रिसमसची शॉपिंग करायला 70 वर्षांचे हेरॉल्ड गेले होते. हेरॉल्ड हे शॉपिंग करून झाल्यावर एका हॉटेलमधील स्पा आणि कसीनोमध्ये गेले. ख्रिसमसच्या निमित्ताने तेथे पोकरचा शो सुरू होता. त्यांनी नशीब साथ देते का बघूया म्हणत तो खेळ खेळायचा ठरवला. आणि आपल्या आयुष्यात हेरॉल्ड यांनी पहिल्यांदाच पोकरची पैज लावली.

थ्री कार्ड पोकर टेबलवर बसण्याचा निर्णय हेरॉल्ड यांनी घेतला. कार्डची बोनस पैज लावली. बघता बघता हेरॉल्ड जवळपास करोड रुपयांची पैज जिंकले. बोर्गोटा हॉटेल आणि कसीनोच्या माहितीनुसार 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे. एका व्यक्तीने पहिल्यांदा एवढी मोठी रक्कम जिंकली आहे. त्याचबरोबर नव्हे तर कसीनोने ट्विट करून हेरॉल्ड यांनी एवढी मोठी रक्कम जिंकल्याची माहिती दिली आहे. आपल्या आयुष्यात हेरॉल्ड दोनदा कॅन्सरशी झगडले आहेत.

No comments