Page Nav

HIDE

Breaking News:

latest

आता "बागी 3" मध्येही झळकणार सारा अली खान ?

अभिनेता  सैफ अली खानच्या  लेकीने  सारा अली खान ने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.  ‘ केदारनाथ ’  या चित्रपटातून तिने चंदेरी दुनियेत पा...

अभिनेता सैफ अली खानच्या लेकीने सारा अली खानने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. केदारनाथ’ या चित्रपटातून तिने चंदेरी दुनियेत पाऊल ठेवलं असून हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिच्या पदरात अनेक चित्रपट पडल्याचं पाहायला मिळत आहे. केदारनाथनंतर तिचा आगामी सिम्बा’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही चित्रपटाव्यतिरिक्त तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या असून साजिद नाडियादवालाच्या आगामी बागी 3’ साठीदेखील तिला विचारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

बागी 3’ मध्ये पुन्हा एकदा टायगर श्रॉफ झळकणार असून सारा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या बागीमध्ये टायगरसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूरने स्क्रीन शेअर केली होती. तर बागी 2’ मध्ये दिशा पटानी झळकली होती.

सध्या तरी केवळ साराला बागी 3’ साठी विचारणा करण्यात आल्याचं सांगण्यात येत असून यावर साराने तिचा निर्णय दिलेला नाही. मात्र साराने या चित्रपटासाठी होकार दिला तर पहिल्यांदाच तिला टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणार आहे.

बागी’ व बागी 2’ या दोन्ही चित्रपटांना पे्रक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. बागीमध्ये टायगर श्रॉफसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. दोघांचीही आॅनस्क्रिन केमिस्ट्री जबरदस्त होती. बागी’ हिट झाल्यानंतर याच्या सीक्वलमध्ये टायगरसोबत त्याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटानी झळकली. टायगर व दिशाचा रोमान्सही हिट झाला. प्रेक्षकांना हा चित्रपट भावला. 

या दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर बागी 3ची तयारी सुरु झाली आहे. आता केवळ यातील टायगर व साराचा रोमान्स प्रेक्षकांना किती भावतोतेच बघायचेय.  तूर्तास सारा सिम्बाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्या अपोझिट रणवीर सिंग दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट येत्या 28 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

No comments