Page Nav

HIDE

Breaking News:

latest

सारा अली खान ठरली 2018 ची 'टॉप डेब्यूंटांट ऑफ दि इयर'

सध्या सारा अली  खानची फिल्म सिम्बा ब्लॉकबस्टर झाल्याची चर्चा असतानाच स्कोर ट्रेंड्स इंडियाकडून सारा अली खानला दूहेरी आनंद मिळालाय. स्कोर ट्र...

सध्या सारा अली खानची फिल्म सिम्बा ब्लॉकबस्टर झाल्याची चर्चा असतानाच स्कोर ट्रेंड्स इंडियाकडून सारा अली खानला दूहेरी आनंद मिळालाय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या डेब्यूटांट चार्टवर सारा सर्वाधिक लोकप्रिय डेब्यूटांट ऑफ दि इयर बनली आहे. एकिकडे सारा अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे समोर येतेय. तर दूसरीकडे अभिनेत्यांमध्ये ईशान खत्तर जास्त लोकप्रिय आहे.

करण जोहरच्या 'ध़डक' मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणा-या जान्हवी कपूरला मागे टाकत साराने पहिले स्थान पटकावले आहे. बॉलीवूडमध्ये 2018 मध्ये पदार्पण करणा-यांच्या लिस्टमध्ये सारानंतर जान्हवीचाच दूसरा क्रमांक आहे.

2018 मध्ये साराच्या केदारनाथ आणि सिम्बा ह्या दोन फिल्म्स रिलीज झाल्या. तर ईशानचेही बिय़ॉन्ड दि क्लाउड्स आणि धडक हे दोन चित्रपट रिलीज झाले होते.

बॉलीवूड अभिनेत्रींच्या 2018 च्या रँकिंगमध्ये डिजिटल न्यूज़मध्ये साराचा तिसरा क्रमांक लागतो. तर न्यूज़पेपर रँकिंगमध्ये सारा दूस-या स्थानावर आहे. वायरल न्यूज़ रँकिंगमध्ये ती पाचव्या पदावर आहे. तर साराची प्रतिस्पर्धक मानली जाणारी जान्हवी डिजिटल न्यूजमध्ये नवव्या क्रमांकांवर आहे. न्यूजपेपर रँकिंगमध्ये दहाव्या आणि वायरल न्यूज रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर आहे.

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "सारा आणि जान्हवी दोघींच्या पहिल्या सिनेमाने भरपूर लोकप्रियता मिळवली नव्हती. मात्र साराच्या बाबतीत तिच्या दूस-या सिनेमाने ही कसर भरून काढली. साराची दूसरी फिल्म सिम्बाच्या प्रमोशनने साराच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली. सोशल प्लेटफॉर्मवर्तमानपत्र आणि वायरल न्यूज़ रँकिंगमध्ये साराची लोकप्रियता सिनेमाच्या रिलीजच्या सूमारास वाढलेली दिसून आलीय. "

No comments