Page Nav

HIDE

Breaking News:

latest

बॉक्स ऑफिसवरील 2018 मधील टॉप-5 सिनेमे

2018  हे वर्ष संपायला काही दिवसचं उरले आहेत. अशावेळी बॉक्स आफिसवर नजर टाकायची झाली तर यंदा सिनेमांनी दमदार कमाई केली आहे. तर काही सिनेमा अजू...

2018 हे वर्ष संपायला काही दिवसचं उरले आहेत. अशावेळी बॉक्स आफिसवर नजर टाकायची झाली तर यंदा सिनेमांनी दमदार कमाई केली आहे. तर काही सिनेमा अजून प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

5] Baaghi 2
यावर्षी टायगर श्रॉफच्या हटके एण्ट्रीमुळे त्याचा 'बागी-2' सिनेमा बॉक्स ऑफिसच्या टॉप-5 चित्रपटांमध्ये पोहचला आहे. टायगरच्या बागी-2 चित्रपटाने 37 आठवडे आणि 4 दिवसात जवळपास 165 कोटी कमावले आहेत. या सिनेमाच्या कमाईने आमिर-अमिताभच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ला देखील मागे टाकलं आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तानने 6 आठवड्यामध्ये 150 कोटींचा गल्ला केला आहे.

4] Race 3
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या रेस-3 सिनेमा चौथ्या क्रमांकावर आहे. प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. म्हणूनच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली होती. 27 आठवड्यामध्ये चित्रपटाने 166 कोटी रूपये कमवले होते.

3] 2.0 #2pointO
बॉलिवूडचे सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षयकुमार यांचा 2.0 या चित्रपटानं 3 आठवड्यातच 177.75 कोटी कमवल्याने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. खरतर 2.0 सिनेमाची कमाई जवळपास 650 कोटींपेक्षाही जास्त आहे. पण सिनेमा डिजिटल हक्क विकले असल्याने एवढी कमाई झाली आहे.

2] Padmaavat
2018 वर्षामध्ये गाजलेला आणि अत्यंत संकटांना सामोरे गेलेला 'पद्मावतसिनेमा बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सिनेमाची चर्चा पाहून सिनेमा पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असणार याचा अंदाज होता. एकूण 47 आठवड्यांमध्ये चित्रपटाने 302 कोटींची कमाई केली आहे.

1] Sanju
यंदा सर्वात जास्त चर्चा रणबीर कपूरच्या 'संजूचित्रपटाची झाली आहे. राजकुमार हिरानी यांच्या संजू चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला. राजकुमार हिरानीने या चित्रपटाच्या कमाईसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॅटर्जी वापरल्या होत्या. फक्त सहा महिन्यांमध्ये चित्रपटाने 342.53 करोड कमवले आहेत. त्यामुळे यंदाच्या बॉक्स ऑफिस रेकॉर्डमधील सर्वात जास्त कमाई केलेला चित्रपट 'संजूठरला आहे.


No comments