Page Nav

HIDE

Breaking News:

latest

लवकरच येणार सैराट 2 | अशी असणार कथा

सैराट  हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता. केवळ मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील या चित्रपटाची चर्चा झाली होती. या चित्रपटा...

सैराट हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता. केवळ मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील या चित्रपटाची चर्चा झाली होती. या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्चीपरशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता या चित्रपटाच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच सैराट 2 प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे.

एबीपी माझा या वाहिनीच्या वृत्तानुसार या सिनेमाचे चित्रीकरण देखील सुरू झाले आहे. या सिनेमाचे चित्रीकरण पुण्यात सुरू असून पुण्याच्या चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात सैराट या नावाची नोंदणी झाल्याचे वृत्त देखील त्यांनी दिले आहे. या चित्रपटाची कथा काय असणार याबाबत देखील त्यांनी माहिती दिली आहे.

आर्ची आणि परशाचा मुलगा मोठा झाला असल्याचे चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. आर्ची आणि परशा हैद्राबादला पळून आल्यानंतर सुमन अक्काने त्यांच्या पाठिशी उभे राहात त्यांना हरपरीने मदत केली होती. हीच अक्का म्हणजेच छाया कदम त्यांच्या मुलाचे संगोपन करणार आहे. पण त्यानंतर त्याचा ताबा अक्का त्याच्या मावशीकडे देणार आहे. या सिनेमात या मावशीची भूमिका मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेली दिल चाहाता है फेम सोनाली कुलकर्णी साकारणार असल्याची चर्चा आहे.

No comments