Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Naal Marathi Movie Review : प्रेक्षकांशी 'नाळ' जोडणारा चित्रपट

कलावंत:  नागराज मंजुळे , देविका दफ्तरदार , सेवा चव्हाण , ओम भूतकर , श्रीनिवास पोकळे दिग्दर्शक:  सुधाकर रेड्डी यंकट्टी सिनेमा प्रकार:   Drama...


कलावंत: नागराज मंजुळे,देविका दफ्तरदार,सेवा चव्हाण,ओम भूतकर,श्रीनिवास पोकळे
दिग्दर्शक: सुधाकर रेड्डी यंकट्टी
सिनेमा प्रकार: Drama
कालावधी: 1 hrs. 57 Min.

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या गोष्टी सांगत असतानाच नागराज मंजुळेसारखा निर्माता-दिग्दर्शक वास्तवावर नेमकं बोट ठेवत असतो. म्हणजे तो सिनेमाच्या माध्यमातून चार घटका रंजनाचा मार्ग अवलंबतोच. मात्रहे रंजन टिपिकल फिल्मी’ होणार नाहीया रंजनाची प्रेक्षकांशी नाळ तुटणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतो. सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित नाळ सिनेमाही अशीच एक वास्तवाची गोष्ट सांगतो. गावाकडचं जातवास्तवऐन तारुण्यात प्रेमाच्या आगीत होरपळणं असे विषय हाताळल्यानंतर नागराज नाळ’ या सिनेमातून एका लहान मुलाचं भावविश्व उलगडतो. आई आणि मुलाचे भावबंध उलगडतो. अर्थात आठ वर्षांच्या चैतन्यची ही गोष्ट केवळ त्याची गोष्ट राहत नाहीतर लहानांसोबत मोठेही या गोष्टीत गुंततात. त्याच्या भावविश्वात हरवून जातातगुंतून जातात. लेखक-दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी एक अतिशय नेटका चित्रपट आपल्यापुढं सादर करतात. मुळात कागदावरच सशक्त असलेला हा सिनेमा अप्रतिम अभिनयपार्श्वसंगीत आणि नयनरम्य छायाचित्रणाच्या जोरावर पडद्यावर प्रभावी ठरतो. टिपिकल मनोरंजनाची वाट नाकारून काही वेगळं पाहू इच्छिणाऱ्यांनी नाळचा अनुभव घ्यायला हरकत नाही.

नाळ या चित्रपटाचे लोकेशन आणि सिनेमॅटोग्राफी इतकी अप्रतिम आहे की हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यात खरी मजा आहे. सुरुवातीला चित्रपट थोडासा संथ वाटत असला तरी नंतर चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी अतिशय सहजपणे अभिनय केला आहे. श्रीनिवासदेविकानागराज या सगळयांनी आपल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या आहेत.  श्रीनिवासच्या चेहऱ्यावरील निरागस भाव तर प्रेक्षकांचे मन जिंकतात. अनेक दृश्यात संवाद नसताना देखील देविकाने तिच्या डोळ्यातूनहावभावतून केलेला अभिनय अप्रतिम आहे. चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा खूपच चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत.  जाऊ दे न वं हे गाणे ऐकायला मस्त वाटते. सुधाकर यांची दिगदर्शन करण्याची पहिली वेळ आहे असे चित्रपट पाहताना कुठेच जाणवत नाही. केवळ काही दृश्य चित्रपटात पुन्हा पुन्हा येत असल्याचे जाणवते. तसेच चित्रपट सुरुवातीला आणि शेवटाला जाताना थोडा संथ होतो. चित्रपटाचे संवाद देखील चांगले आहेत. चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शकाने सगळ्या गोष्टी संपूर्णपणे उलगडून न सांगता कोणत्याही संवादाशिवाय चित्रपटाचा आशय लोकांपर्यंत पोहोचवला आहे. यासाठी दिग्दर्शकाचे करावे तितके कौतुक कमी आहे. हा शेवट मनाला नक्कीच भिडतो.


No comments