Page Nav

HIDE

Breaking News:

latest

रितेश देशमुखच्या 'माऊली' या चित्रपटातील पहिले गाणे ऐकले का?

' लय भारी '  सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख नवीन सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन आला आहे. या चित्रपटाचे ना...

'लय भारीसिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख नवीन सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन आला आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'माऊली'. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीझर शाहरुख खानने ट्विटर अकाऊंवरून शेअर केला होता. दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि संवाद ऐकायला मिळाले आहेत. या चित्रपटात रितेश एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या सिनेमात रितेशसोबत मिर्झिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री सैयामी खैर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

आजच्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावरमाऊलीचं पहिलं गाणं!! माझी पंढरीची माय!! असे रितेशने फेसबुक पोस्ट सोबत लिहिले आहे.

आता या चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हे गाणे रितेश देशमुखने त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे कीआजच्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावरमाऊलीचं पहिलं गाणं!! माझी पंढरीची माय!! या पोस्टसोबत रितेशने सैयामी खैरजेनेलिया डिसोजा देशमुखसिद्धार्थ रामचंद्रअजय-अतुलगुरू ठाकूरआदित्य सरपोतदार यांना टॅग केले आहे. हे गाणे रितेशने शेअर केल्यानंतर केवळ दहा मिनिटांच्या आता या गाण्याला सहाशेहून अधिक लाइक्स आले असून ८५ हून अधिक लोकांनी हे गाणे शेअर केले आहे. हे गाणे अप्रतिम असल्याचे लोक प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत.

Majhi Pandharichi Maay - FULL SONG | Mauli | Riteish Deshmukh

No comments