Page Nav

HIDE

Breaking News:

latest

लवकरच हसवायला येतोय अक्षयकुमार ‘हाऊसफुल ४’ चं चित्रीकरण पूर्ण

हाऊसफुल  सीरिजमधला चौथा भाग  ‘ हाऊसफुल ४ ’  या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच संपलं आहे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारने ही माहिती ...

हाऊसफुल सीरिजमधला चौथा भाग हाऊसफुल ४’ या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच संपलं आहे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारने ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर आपण लवकरचं भेटू असंही त्याने म्हटलं आहे.

'हाऊसफुल 4' मध्ये एकच धमाल आहे. हाऊसफुल सीरिजमधला हा चौथा भाग. मध्यंतरी हा सिनेमा वादात सापडला होता.
साजिद नाडियादवालाच्या हाऊसफुल-4 मधून नाना पाटेकरांना हटवण्यात आलं. तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपात सध्या नाना पाटेकर आहेत. त्यामुळे नाना या सिनेमापासून लांब राहत होते. आता मात्र निर्मात्यांनी चित्रपटातून नानांना हटवून त्या भूमिकेसाठी एका तरुण कलाकाराची निवड करण्यात आली आहे. साऊथचा सुपरस्टार राणा दग्गुबाती हा नानांच्या बदल्यात सिनेमात दिसणार आहे.

अभिनेता राणाला बाहुबलीमधून भल्लालदेवच्या भूमिकेत सर्वांनी पाहिलं आहे. बॉलिवूडमध्ये राणाने बेबीद गाझी अटॅकयह जवानी है दिवानी यांसारखे सिनेमे केले आहेत आणि आता एका नवीन सिनेमात तो झळकणार आहे. नानांवर झालेल्या आरोपांनंतर सिनेमात त्यांच्या रिप्लेसमेंटची बातमी पसरत होती आणि अखेर निर्मात्यांनी नानांच्या बदल्यात राणाला चित्रपटात घ्यायचे ठरवले आहे.

हाऊसफूल सिनेमाचा आत्मा असलेले अक्षयकुमाररीतेश देशमुख आणि बोमन इरानी हे चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेतच. पण दरवेळीसारखं सिनेमातील अभिनेत्री बदलण्यात आल्या आहेत. या सिक्वेलमध्ये क्रिती सेननक्रिती खारबांडा या दोघी दिसणार आहेत.

No comments