Page Nav

HIDE

Breaking News:

latest

जाहिरातींचा जादूगार

थॉमस  जे बरेल हे अभ्यासात हुशार नव्हते. शाळेत घेतल्या गेलेल्या बुद्धीमत्ता परीक्षणात त्यांची कामगिरी अगदी सामान्य होती. याच गोष्टीमुळे त्यां...

थॉमस जे बरेल हे अभ्यासात हुशार नव्हते. शाळेत घेतल्या गेलेल्या बुद्धीमत्ता परीक्षणात त्यांची कामगिरी अगदी सामान्य होती. याच गोष्टीमुळे त्यांच्या पालकांना चिंता होती कीथॉमस मोठा झाल्यानंतर काय करेलत्याची उपजीविका आणि भावी जीवन कसे असेलथॉमसच्या पालकांनी आपली चिंता शाळेच्या शिक्षकांना बोलून दाखवली. तेव्हा शिक्षकांनी त्याच्या कुटुंबियांना धीर दिला आणि सांगितले की, ‘थॉमसकडे कलात्मक बुद्धी आहे’.

काही वर्षांनतर थॉमस यांचे कलागुण आणि लेखन पाहून कुणीतरी जाहिरातींचे लेखन करण्याचा सल्ला दिला आणि त्यानेही तशी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना १९६० साली वेड अॅडव्हर्टायझिंग’ कंपनीमध्ये मेल विभागात ५० डॉलर्स महिना पगार असलेली नोकरी मिळाली. पण त्यांना जाहिरात लिहण्यात रस असल्याने मिळालेल्या नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. एक दिवस त्यांनी कंपनीच्या संचालकांना आपली व्यथा बोलून दाखवली आणि जाहिरात लिखाणाची संधी मागितली. अशी संधी मिळाल्यास कंपनीला फायदा होईलअसेही ते म्हणाले. थॉमस यांनी लिहलेल्या काही जाहिराती संचालकांना दाखवल्या. थॉमसची प्रतीभा लक्षात घेऊन त्यांना जाहिरात लिखाणाची संधी देण्यात आली. त्यांनी लिहलेल्या जाहिरातींना चांगला प्रतिसाद मिळाला. 

काही काळ जाहिरात लेखनाचा अनुभव घेतल्यानंतर थॉमस यांनी १९७१ साली स्वत:ची जाहिरात कंपनी सुरू केली. सुरुवातीला त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पहिल्या सहा महिन्यात त्यांच्या कंपनीचं दिवाळं निघालं. पण त्यांनी आशा सोडल्या नाहीत. १९७२मध्ये त्यांना मॅकडोनाल्डच्या रुपाने एक मोठा ब्रँड मिळाला. त्या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कोका कोलाफोर्ड मोटारजॉनसन अँड जॉनसनप्रॉक्टर अँड गॅम्बल सारख्या मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती थॉमस यांच्या कंपनीने तयार केल्या. थॉमस यांच्या प्रतीभेचा गौरव करण्यासाठी त्यांना जाहिरातीच्या जगातील सर्वोच्च क्लियो पुरस्कार देण्यात आला. 

No comments