Page Nav

HIDE

Breaking News:

latest

“भाऊ कदम” ठरणार का पुन्हा एकदा 'नशीबवान'? बघा चित्रपटामधील 'ब्लडी फुल जिया रे' हे गाणं

' चला हवा येऊ द्या '  मुळे भाऊ कदम घराघरात पोचले. भाऊंचे फॅन्सही खूप आहेत. छोट्या पडद्यावरून भाऊ कदम पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अवत...

'चला हवा येऊ द्यामुळे भाऊ कदम घराघरात पोचले. भाऊंचे फॅन्सही खूप आहेत. छोट्या पडद्यावरून भाऊ कदम पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अवतरणार आहेत.

आयुष्यात कोणतीही चांगली किंवा वाईट घटना घडली की आपण थेट नशीबाला जबाबदार धरत असतो. मुळातआपले नशीब हे आपल्या हातात असते. आयुष्यात येणाऱ्या चढ उताराला माणूसच जबाबदार असतोमात्र नाव नशिबाचं नाव पुढे केले जाते. नशिबाच्या याच संकल्पनेवर आधारित अभिनेता भाऊ कदम यांचा आगामी 'नशीबवान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भाऊ कदम यांचा आगामी चित्रपट 'नशीबवानहा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामधील 'ब्लडी फुल जिया रेहे गाणं नुकतेच रिलीज झालं. उडत्या चालीचं असणारं हे गाणं आनंद शिंदे यांनी स्वरबद्ध केलंय. सोहम पाठक यांनी या गाण्याला संगीत दिले तर शिवकुमार ढाले यांनी हे गाणं लिहिलं आहे. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन विठ्ठल पाटील यांनी केलं आहे.


अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल नेटवर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं असून या मोशन पोस्टवर भाऊ कदम एक स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्याच्या हातात त्याचा साथीदार म्हणजे साफ सफाई करणारा झाडूसुद्धा तेवढ्याच दिमाखात चमकत असल्याचे पाहायला मिळते.
उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दिवारया कथेवर आधारीत असलेला 'नशीबवान'  हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

No comments