Page Nav

HIDE

Breaking News:

latest

बघा “कबीर सिंग” मधील शाहिद कपूरचा कडक लूक

‘ पद्मावत ’   नंतर  शाहिद  कपूर कुठल्या चित्रपटांमधून दिसणार याबद्दल चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे त्याने फार किचकट भूमिका न स्वीकारताही त...

पद्मावत नंतर शाहिद कपूर कुठल्या चित्रपटांमधून दिसणार याबद्दल चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे त्याने फार किचकट भूमिका न स्वीकारताही त्यातल्या त्यात वेगळ्या विषयांवरच्या चित्रपटांची निवड केली. पण बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला. या चित्रपटानंतर तो अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लूक शाहिदने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोंमध्ये शाहिद क्लीन शेव्हमध्ये दिसत आहे. अर्जुन रेड्डीच्या या हिंदी रिमेकचं नाव कबीर सिंग’ असं आहे. मूळ चित्रपट मस्त जमला आणि बॉक्स ऑफीसवर तो हिटही झाला आहे त्यामुळे खरंतर या चित्रपटाचा रिमेक व्हायलाच नकोहेच आपलं मत होतं असं तो म्हणतो. मात्र हा चित्रपट आणि त्यातील व्यक्तिरेखा पाहिल्यानंतर आपण ती करायला हवीहा विचार स्पर्शून गेला आणि म्हणूनच या चित्रपटाला होकार दिल्याचं तो म्हणाला. या रिमेकमध्ये शाहिदसोबत कियारा अडवाणी झळकणार आहे.
A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

'कबीर सिंग' हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. गेल्या आठवड्यापासून शाहिदने कबीर सिंगच्या चित्रीकरणास सुरूवात केली. मुंबई- दिल्लीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडणार आहे. या चित्रपटात शाहिद वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

शाहिद या चित्रपटात एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे.  यात त्याचे चार लूक पाहायला मिळणार आहेत आणि शाहरूख गेल्या तीन महिन्यापासून या भूमिकेच्या तयारीला लागला आहे. शाहिद सोबत या चित्रपटात कियारा अाडवाणी दिसणार आहे. 'एम.एस. धोनी', 'लस्ट स्टोरीमध्ये कियाराने काम केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कियाराशाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. शाहिदचे चाहते 'कबीर सिंगचित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.No comments