Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'नाळ' सिनेमाचा पहिल्याच आठवड्यात विक्रम- करोडोंची कमाई

मराठी  प्रेक्षक ज्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होता. त्या सिनेमाला प्रदर्शित होऊन आज आठवडा झाला आहे. तो सिनेमा म्हणजे झी स्टुडिओ आणि नागराज...

मराठी प्रेक्षक ज्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होता. त्या सिनेमाला प्रदर्शित होऊन आज आठवडा झाला आहे. तो सिनेमा म्हणजे झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे प्रस्तुत 'नाळ'. सुधारकर रेड्डी दिग्दर्शित नाळ हा सिनेमा 16 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि अगदी सातच दिवसांतच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली आहे.

सर्वत्र हाऊसफुल्लचा बोर्ड लावत या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात करोडोंची कमाई केली असून विक्रम रचला आहे. नागराज मंजुळे म्हटलं की सिनेमा इतिहास रचणार यात शंकाच नाही आणि पुन्हा एकदा ते अधोरेखित झालं आहे. 'नाळया सिनेमाने पहिल्याच आठवड्यात तब्बल 14 करोड रुपयांची कमाई केली असून विक्रम रचला आहे.श्रीनिवास पोकळेने चैत्याची भूमिका इतकी सुंदर निभावली आहे कीप्रत्येकाला ती आपलीच कथा वाटत आहे. लहान मुलाचं भावविश्व सुधाकर रेड्डीच्या या कथेत आहे. त्याला नागराज मंजुळेने जोडलेले संवाद अतिशय मनाला भावतात. नागराजच्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या सिनेमातील कलाकार. ज्या कलाकारांनी अभिनय क्षेत्रात काहीच काम केलेलं नसतं अशांना घेऊन नागराज सिनेमा करतो.


No comments