Page Nav

HIDE

Breaking News:

latest

त्यांची आई होणे मला जमणार नाही!! -करिना कपूर

करणच्या  ‘ Koffee with Karan ’  या शोमध्ये नुकतीच सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारानं उपस्थिती लावली. या शोदरम्यान साराने करिनाला छोटी माँ म...


करणच्या Koffee with Karan’ या शोमध्ये नुकतीच सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारानं उपस्थिती लावली. या शोदरम्यान साराने करिनाला छोटी माँ म्हटलं तर आवाडणार नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये करिनानेदेखील सावत्र मुलं सारा अली खान आणि इब्राहम खान यांच्याशी असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे. सारा आणि इब्राहम यांची मी कधी आई होऊ शकत नाही असं ती म्हणाली आहे.

मी कधीही सारा आणि इब्राहिमची आई होऊ शकत नाहीअसे करिना म्हणाली. मी आणि सारा-इब्राहिम केवळ चांगले मित्र होऊ शकतो. मी त्यांची आई कधीही बनू शकणार नाहीहे मी सैफला लग्नाआधीच सांगितले होते. कारण सारा व इब्राहिमजवळ आधीच अमृतासारखी चांगली आई आहे. तिने त्या दोघांना अतिशय प्रेमाने वाढवले आहे. मी केवळ सारा व इब्राहिमला प्रेम करू शकते. त्यांची मैत्रिण बनू शकते. त्यांची आई होणे मला जमणार नाही. त्यांना जेव्हा केव्हा माझी मदत आणि सल्ला लागेलत्यावेळी मी कायम त्यांच्यासोबत असेल,’असे करिना यावेळी म्हणाली.

सारा लवकरच केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे करिना अनेक वेळा साराला बॉलिवूडमध्ये कसं वावरावं याविषयी सल्ले देत असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे सारा आणि करिनामध्ये सावत्र नातं असूनही त्या मैत्रिणीप्रमाणे वावरत असतात. सारा आणि अब्राहम यांची मी चांगली मैत्रिणी होऊ शकते पण आई होणं मला जमणार नाही. त्यांना जेव्हा माझी मदत लागेल तेव्हा मी कायम हजर असेनअसं मी सैफला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं’, असं करिना म्हणाली.

साराच्या डेब्यूबद्दल विचारले असतासारा ही जन्मत:च एक स्टार आहे. तिच्या बोलण्याने कुणालाही प्रभावित करू शकते. भविष्यात ती एक मोठी स्टार होणारयात मला जराही शंका नाहीअसे करिना म्हणाली. पुढे ती असंही म्हणाली, ‘त्यांच्याकडे अमृतासारखी चांगली आई आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या आईची गरज नाहीये. याच कारणामुळे मी त्यांची आई होऊ शकत नाही. पण एक चांगली मैत्रिणी कायम असेन’.

No comments