Page Nav

HIDE

Breaking News:

latest

रणबीर कपूरसोबतच्या लग्नावर पहिल्यांदा बोलली आलिया भट्ट!!

गेल्याकाही  दिवसांपासून चर्चेत असलेलं  आलिया-रणबीरच्या  रिलेशनबाबत आता काही विधान केली जात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लक्स गोल्डन रोस अॅवॉर...

गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत असलेलं आलिया-रणबीरच्या रिलेशनबाबत आता काही विधान केली जात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लक्स गोल्डन रोस अॅवॉर्डमध्ये आलियानं लग्नावरून काही खुलासा केला आहे.

बॉलिवूडच्या या वेडिंग सीझनमध्ये आणखी एका कथित कपलच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. होयहे कपल म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. आलिया व रणबीर कथितरित्या एकमेकांना डेट करताहेत आणि लवकरच लग्न करणारअशी चर्चा आहे. पण आलियाचे मानाल तर या लग्नाला अद्याप वेळ आहे.

दीपिका आणि रणवीरच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये अनेक जोडप्यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरू आहे. त्यातीलच एक आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे प्रसिद्ध जोडपं आहेच आणि यांच्या रिलेशन चर्चा असतानाच आता मात्र खुद्द आलिया भट्टने याबाबत खुलासा केला आहे.A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on
आलियाने पहिल्यांदा रणबीरसोबतच्या लग्नाच्या चर्चेवर चुप्पी सोडत एक नवा खुलासा केला आहे. अलीकडे लक्स गोल्डन रोज अवार्ड्स 2018’मध्ये आलियाने हजेरी लावली. यावेळी आलियाला तिच्या लग्नाबद्दल छेडण्यात आले. साहजिकचं आलियाने अतिशय शिताफीने उत्तर दिले. लोक माझ्या लग्नासाठी उतावीळ झाले असतील तर त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. कारण माझ्या मतेक्लायमॅक्स चांगला असायला हवी.  एंडिंगही हॅपी व्हायला हवी,’ असे आलिया म्हणाली.

लक्स गोल्डन रोस अॅवॉर्डच्या रेड कार्पेटवर आलियानं लग्नाबाबत खुलासा केला आहे कि बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा काळ चालू आहे. यावेळी तिने दीपिका आणि रणवीरला लग्नासाठी शुभेच्छा देत प्रियांकाच्या लग्नाबाबत ती फार खूश आहे असं तिने म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून आलिया व रणबीरच्या प्रेमाच्या चर्चा जोरात आहेत. ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर दोघेही अनेकदा एकत्र दिसलेत.

No comments