Page Nav

HIDE

Breaking News:

latest

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मुळे थिएटर मालक निराश

अमिताभ बच्चन  आणि  आमिर खान  यांचे जोडी इतिहास मध्ये प्रथम च  बॉक्स ऑफिस वर सह दृष्टी आली. फिल्म रिलीझ करण्यापूर्वी प्रेक्षकांना भारी उत्साह...

अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांचे जोडी इतिहास मध्ये प्रथमच बॉक्स ऑफिस वर सह दृष्टी आली. फिल्म रिलीझ करण्यापूर्वी प्रेक्षकांना भारी उत्साह होता.

यशराज फिल्म्सने आमिर खान आणि अमिताभ बच्चन या मोठ्या कलाकारांसोबत ठग्स ऑफ हिंदोस्तानसारखा भव्य- दिव्य चित्रपट केला आणि तो तितक्याच भव्य-दिव्यतेने आपटला. त्यामुळे आता थिएटर मालक आमिरकडे नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचं समजतंय.

आमिरचा चित्रपट म्हणून देशभरातील चित्रपटगृहांमध्ये चार- चार शोज लावणाऱ्या वितरकांचे धाबे दणाणले. बॉलिवूड हंगामा या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या अपयशाने थिएटर मालक निराश आहेत. मोठ्या कलाकारांची वर्णी असलेल्या या चित्रपटामुळे दिवाळीत चांगली कमाई होईल अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्याच्या उलट चित्र समोर आलं. चित्रपटाच्या निर्मितीवर जवळपास ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला असून गेल्या दहा दिवसांत चित्रपटाची बॉक्स ऑफीस कमाई फक्त १४३ कोटी रुपये इतकीच झाली आहे. त्यामुळे थिएटर मालक आमिरकडे नुकसान भरपाईची मागणी करणार आहेत.

No comments