Page Nav

HIDE

Breaking News:

latest

रुपेरी पडद्यावर मुंबई आणि पुण्याचे प्रेम | बघा 'मुंबई-पुणे-मुंबई ३' चा ट्रेलर

रुपेरी पडद्यावर मुंबई आणि पुण्याचे प्रेमळ भांडण दाखवणारे अभिनेता  स्वप्नील जोशी ,  अभिनेत्री मुक्ता बर्वे  आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे ही त्र...

रुपेरी पडद्यावर मुंबई आणि पुण्याचे प्रेमळ भांडण दाखवणारे अभिनेता स्वप्नील जोशीअभिनेत्री मुक्ता बर्वे आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे ही त्रयी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'मुंबई पुणे मुंबईया चित्रपटाचा आता तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बहुप्रतिशिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. एकमेकांशी सतत भांडणाऱ्या या जोडीच्या संसारवेलीवर एक गोंडस फुल उमलणार आहे आणि हिच गोष्ट मुंबई- पुणे- मुंबई ३’ मध्ये पाहायला मिळणार आहे. तिसरा भाग येणारा हा कदाचित मराठीमधला पहिलाच चित्रपट असेल. करिअरला प्राधान्य देत संसाराचा गाडा सांभाळणाऱ्या गौरी गौतमच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार म्हटल्यावर दोन्ही घरात एकच गडबड गोंधळ सुरू होतोअशी साधारण हलकीफुलकी कहाणी मुंबई- पुणे- मुंबई ३ मध्ये दिसणार आहे.

 सतिश राजवाडे दिग्दर्शित मुंबई- पुणे- मुंबई’ ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आलेल्या चित्रपटाच्या सिक्वललाही महाराष्ट्रातच नव्हे तर गोवागुजरातकर्नाटक आणि अगदी अमेरिकायुनायटेड किंग्डमऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधील चित्रपट रसिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यामुळे एकंदरच गौतम आणि गौरीवरचं प्रेक्षकांचं प्रेम पाहता या प्रेमकथेचा आणखी एक पदर मुंबई- पुणे- मुंबई ३’ मध्ये उलगडणार आहे.

हा चित्रपट संपूर्ण राज्यात ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. दोन भागांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर तिसऱ्या भागाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

No comments