Page Nav

HIDE

Breaking News:

latest

फेसबुकच्या ग्रुप चॅटमध्ये आता 250 जणांना Add करू शकणार

सध्याच्या घाईगर्दीच्या युगात एकमेकांशी संपर्क किंवा संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर सर्रास होताना दिसतो. कुणी  WhatsApp  वाप...

सध्याच्या घाईगर्दीच्या युगात एकमेकांशी संपर्क किंवा संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर सर्रास होताना दिसतो. कुणी WhatsApp वापरतोकुणी फेसबुककुणी ट्विटरतर कुणी आणखी काही. मात्रया अनेकदा या प्लॅटफॉर्मवरुन एकाचवेळी काही मर्यादित संख्येतील मित्र-मैत्रिणींशी बोलता येतं. फेसबुकने हेच लक्षात घेऊन नवीन फीचर्स आणण्याचे ठरवले आहे. 

नव्या फीचरनुसारफेसबुकवरुन एकाचवेळी 250 जण एकाच चॅटमध्ये जोडून घेऊ शकतात. याआधी फेसबुकच्या ग्रुपमध्ये केवळ 150 जणांचा समावेश करणं शक्य होतं.फेसबुकच्या ग्रुप चॅटमध्ये आता एकाचवेळी 250 जणांना जोडून घेता येणार असूनया माध्यमातून आता मीटिंगपासून चर्चांपर्यंतते अगदी एकमेकांशी एखाद्या कॉमन विषयांवर गप्पा मारता येतील.

'TechCrunch' च्या वृत्तानुसारफेसबुकवर ग्रुप चॅट कुणी सुरु केल्यानंतर तुम्हाला त्याचं निमंत्रण देणारं नोटिफिकेशन येईल. तुमची परवानगी असेल आणि तुम्ही निमंत्रण स्वीकारलंततरच तुम्ही ग्रुप चॅटमध्ये सहभागी होऊ शकाल. विशेष म्हणजेयामध्ये ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातूनही सहभागी होता येईल.

No comments