Page Nav

HIDE

Breaking News:

latest

“2.0’ची प्रदर्शनापूर्वीच 490 कोटींची कमाई - असे आहेत सर्व राईट्स

सुपरस्टार रजनीकांत  आणि  अभिनेता अक्षय कुमार  यांचा बहुप्रतीक्षित  ‘ 2.0 ’  या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच 490 कोटींची कमाई केली आहे. या 490...

सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा बहुप्रतीक्षित 2.0’ या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच 490 कोटींची कमाई केली आहे. या 490 कोटींमध्ये 2.0’ ने 120 कोटींची अॅडव्हान्स बुकिंग तर 370 कोटी रूपयांचे सॅटेलाईट राईट्सचा समावेश आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वी 2.0 चित्रपटाने सर्वाधिक कमाई केल्याचा विक्रम केला आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 500 कोटी रुपयांचं होतं. त्यामुळे 2.0 ने  प्रदर्शनापूर्वीच 490 कोटींची कमाई केली आहे.

रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बिग बजेट असलेल्या '2.0′ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अनेक विक्रमांची नोंद आपल्या नावे केली आहे. या चित्रपटाने सर्वप्रथम भारतातील सर्वाधिक महागडा चित्रपट असल्याचा बहुमान मिळविला. त्यानंतर ऍडव्हान्स बुकिंगमधून तब्बल 120 कोटींची कमाई करत नवीन विक्रम प्रस्थापीत केला आहे. आता चित्रपटाच्या कमाईबाबतही तो विक्रमी कामगीरी करत आहे.
370 कोटींच्या राईट्सपैकी 60 कोटींचे राईट्स हे डिजिटल स्वरूपातले आहेत. त्यामुळे प्रदर्शनापूर्वी 490 कोटींची कमाई केलेल्या 2.0 चित्रपटाचा सर्व खर्च वसूल झाला आहे.

असे आहेत सर्व राईट्स :

सॅटेलाईट राईट्स
120 कोटी

डिजिटल राईट्स
60 कोटी

नॉर्थ बेल्ट राईट्स
80 कोटी

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राईट्स
70 कोटी

कर्नाटक राईट्स
25 कोटी

केरळ राईट्स
15 कोटी


No comments